या हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापुरकरांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील 'महादेवी हत्ती'ला गुजरातच्या वनतारा केंद्राकडे हस्तांतर करण्यात आले.
महादेवी हत्तीला वनताराच्या ताब्यात देण्यास गावकऱ्यांसह मठाचा विरोध होता.
दरम्यान, आता महादेवी हत्ती जामनगरच्या वनतारामध्ये ३० तारखेला पोहोचली आहे.
महादेवी हत्तीचे वनतारामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ वनताराच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले.
महादेवीच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झाले आहे. वनतारा जामनगरमध्ये तिच्यावर उपचार, तिला सोबती, आणि सन्मान मिळणार आहे.
तिची काळजी जागतिक दर्जाचे डॉक्टर घेतील आणि तिच्यावर 'हायड्रोथेरपी'सारख्या आधुनिक उपचार पद्धतीने इलाज केला जाणार आहे.
१६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने, महादेवीच्या मानसिक व शारीरिक तब्येत मठात असताना खालावत चालली आहे. महादेवीचे स्थलांतर गुजरात येथील वनतारामध्ये सोडण्यात यावे अशी टिप्पणी केली होती.
नांदणी मठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावत महादेवीला त्वरित वनतारात पाठवण्याचे आदेश दिले.