९ वर्षाच्या मुलाकडून हरला असता कार्लसन

९ वर्षीय भारतीयाने कार्लसनला बरोबरीत रोखले

जेव्हा मॅग्नस कार्लसनला डी गुकेशविरुद्ध पराभूत झाला तेव्हा त्याने खेळादरम्यान आपला राग दाखवला होती. त्यानंतर आणखी एक भारतीय त्याला पराभूत करणार होता.

दिल्लीतील नऊ वर्षीय आरित कपिल एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आयोजित 'अर्ली टायटल्ड ट्युजडे' बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला हरवण्याच्या जवळ पोहोचला होता.

'अर्ली टायटल्ड ट्युजडे' बुद्धिबळ स्पर्धेत, आरितने कार्लसनविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला मात्र वेळेअभावी सामना अनिर्णित राहिला.

बुद्धिबळ स्पर्धेत अरितने कार्लसनला जवळजवळ हरवले होते, परंतु वेळेअभावी त्याला सामना अनिर्णित ठेवावा लागला.

आरित कपिल भारताच्या अंडर-९ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेता ठरला होता. तो सध्या जॉर्जिया अंडर-१० जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

या सामन्यात, आरित कार्लसन समोर जिंकण्याच्या स्थितीत होता. परंतु वेळेअभावी तो त्याच्या आघाडी वाढवू शकला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला.

आरित हा भारतातील एक उदयोन्मुख बुद्धीबळपटू आहे. दिल्लीतील या नऊ वर्षांच्या बुद्धिबळपटूने गेल्या वर्षी ग्रँडमास्टरला हरवणारा सर्वात तरुण भारतीय होण्याचा मान मिळवला होता.

केआयआयटी आंतरराष्ट्रीय ओपन स्पर्धेच्या नवव्या फेरीत अमेरिकेच्या ६६ वर्षीय रासेट झियातदिनोव्हला पराभूत करून त्याने ही अविश्वसनीय कामगिरी केली होती.

Click Here