दुधी भोपळा खाण्याचे फायदे
उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर दुधी भोपळ्याचं सेवन करावं. दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतं ज्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते.
दुधी भोपळ्यात कमी कॅलरीज असतात तसंच फायबरचं प्रमाणही पुरेपूर असतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर दुधी भोपळ्याचं सेवन करा.
कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर दुधी भोपळ्याचं सेवन करा.
दुधी भोपळा फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
दुधीमध्ये ट्रिप्टोफॅन असतो, जो मन शांत ठेवण्यास मदत करतो.
दुधी रस घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होते व तणाव, चिडचिड कमी होते.
नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते आणि चमकदार बनते.
पित्त, आम्लपित्त, आणि जळजळ कमी होते.