स्मोकिंग करणाऱ्या मित्रामुळेही होऊ शकतो कॅन्सर

धूम्रपान न करताही फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो

फुफ्फुसांचा कर्करोग हा बऱ्याचदा धूम्रपान करणाऱ्यांना होतो असं मानलं जातं, पण सत्य वेगळे आहे. 

संशोधनातून असे दिसून आले आहे की पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजेच इतर लोकांच्या धुरात श्वास घेणे, तितकेच धोकादायक असू शकते.

जरी तुम्ही धूम्रपान करत नसलात, पण नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात असलात तरी तुमच्या फुफ्फुसांना धोका असतो.

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे दरवर्षी जगभरात सुमारे ६ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात ही संख्या सतत वाढत चालली आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाही पण दुसऱ्याने सोडलेल्या धूरात श्वास घेते तेव्हा त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. 

त्यात दोन प्रकारचे धूर आहेत, सिगारेट जाळल्याने निघणारा आणि धूम्रपान करणाऱ्याच्या तोंडातून निघणारा धूर. हा धूर धूम्रपान न करणाऱ्यांच्या फुफ्फुसात जातो आणि नुकसान पोहोचवतो.

सीटी स्कॅनमध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांच्या फुफ्फुसांना नियमित धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीइतकेच नुकसान दिसून येते.

त्यामुळे यासाठी घरात, कारमध्ये आणि ऑफिसमध्ये धुम्रपानमुक्त वातावरण ठेवा आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपासून किमान ६ फूट अंतर ठेवा.

Click Here