LCD vs AMOLED; कोणता डिस्प्ले फोन चांगला?

स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा डिस्प्ले कोणता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.


AMOLED डिस्प्लेमध्ये रंग अधिक गडद आणि उजळ दिसतात, तर LCD मध्ये रंग थोडे फिकट दिसतात.

AMOLED मध्ये खरा काळा रंग दिसतो, कारण हा पिक्सेल बंद करतो, तर LCD मध्ये काळा रंग बॅकलाइटमुळे राखाडी दिसतो.


LCD डिस्प्ले असलेले फोन स्वस्त असतात, तर AMOLED डिस्प्ले असलेले फोन थोडे महाग असतात.

AMOLED स्क्रीन कमी बॅटरी वापरते, विशेषतः जेव्हा डार्क मोड वापरला जातो. LCD मध्ये बॅकलाइट नेहमीच चालू असतो, ज्यामुळे जास्त बॅटरी वापरते.


AMOLED डिस्प्ले कोणत्याही अँगलने चांगला दिसतो, तर LCD चा पाहण्याचा अँगल मर्यादित असतो.

AMOLED डिस्प्ले पातळ असतो, ज्यामुळे फोन पातळ आणि हलका होतो. LCD मध्ये अतिरिक्त बॅकलाइट लेयर असते.


आता दोन्ही डिस्प्ले उच्च रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात, परंतु AMOLED मध्ये ते अधिक स्मूद दिसतात.


LCD सहसा थोडा अधिक टिकाऊ असतो, AMOLED डिस्प्ले तुटल्यास तो खिशाला मोठी कात्री लावू शकतो. 

Click Here