वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीने जिद्दीने मेहनत करून यश मिळवले
UPSC उत्तीर्ण होऊन आधी IPS आणि त्यानंतर IAS बनलेली अधिकारी मुद्रा गैरोलाबाबत तुम्ही कदाचित ऐकले असेल
मुद्राने तिच्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टरकी सोडली आणि दोनदा सर्वात कठीण असलेली UPSC परीक्षा पास केली.
पहिल्यांदा २०२१ साली मुद्रा १६५ व्या रँकसह यूपीएससी पास झाली, त्यानंतर तिची निवड आयपीएस अधिकारी म्हणून करण्यात आली.
आयपीएस बनल्यानंतरही मुद्रा हिने आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न सोडले नाही, पुढच्या वर्षी लगेच तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ५३ वी रँक मिळवली
मुद्रा देशातील सर्वात चर्चेत IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहे, मात्र आयएएस होण्यासाठी तिला डेंटिस्टचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले
शिक्षणाच्या बाबतीत मुद्रा खूपच हुशार आहे, त्याशिवाय सौंदर्याच्या बाबत बोलायचे तर त्यातही तिने सगळ्यांना मागे सोडले आहे
मुद्रा बऱ्याचदा साडी घालणे पसंत करते, तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बरेच फोटो साडीतील आहेत. ज्यात तिचा अंदाज सगळ्यांना आवडतो