जाणून घ्या...
गुळ हा पदार्थांना गोडवा देणारा एक हेल्दी ऑप्शन आहे. अनेक लोक साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात.
आजकाल बाजारात बनावट गूळ दणक्यात विकला जात आहे तरी, काही टिप्स फॉलो करून आपण खऱ्या आणि बनावट गूळातील फरक ओळखू शकता.
खरा गूळ ओळखण्यासाठी, एका ग्लास कोमट पाण्यात गुळाचा एक छोटा तुकडा टाका. जर तो खरा असेल तर हळूहळू विरघळेल आणि पाणी हलके तपकिरी रंगाचा होईल.
जर पाणी स्वच्छ दिसत असेल किंवा तळाशी पांढरे अवशेष दिसत असतील तर ते साखर किंवा रासायनिक भेसळ दर्शवते.
तुम्ही फायर टेस्ट करूनही खऱ्या आणि बनावट गूळातील फरक ओळखू शकता. गुळ एका चमच्यावर मंद आचेजवळ ठेवा.
खरा गूळ गरम केल्यास तीव्र वास अथवा काळा धूर न होता वितळेल, तर बनावट गूळ जाळताच तीव्र रासायनिक वास आणि गडद धूर दिसेल.
खरा गूळ गडद तपकिरी किंवा सोनेरी रंगाचा असतो आणि थोडासा दाणेदार दिसतो.
याशिवाय, तो फार चमकदार अथवा त्यात चिकनपणा नसतो.