पाकिस्तानात एक पोळी किती रुपयांना मिळते?

जाणून थक्क व्हाल...!

पाकिस्तान सरकार सातत्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचा दावा करत असते. मात्र या उलट पाकिस्तानवरील परकीय कर्ज सातत्याने वाढताना दिसत आहे.

पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, यावर्षी पोळी आणि नानच्या किमतीत बदल करण्यात आला होता. मात्र, दुकानदार तो स्वीकारायला तयार नाहीत.

डॉनच्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानात १८० ग्रॅम पोळीची किंमत १५ ते २० पाकिस्तानी रुपये एवढी आहे. अर्थात, भारतीय चलनाचा विचार करता सुमारे ५-६ रुपये.

याशिवाय, तेथे १५ ग्रॅम नानची किंमत २५-३० पाकिस्तानी रुपये एवढी आहे. भारतीय चलनात त्याचे मूल्य ७ ते ९ रुपये एवढे आहे.

पाकिस्तान सरकार प्रयत्न करत असूनही महागाईवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना अपयश येत आहे. एवढेच नाही तर, दुकानदार सरकारच्या आदेशांचे पालन करत नाहीत.

पाकिस्तानचे ४६% बजेट केवळ कर्जफेडीवरच खर्च होत आहे. यावरून, पाकिस्तान किती मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, हे समजू शकते.

अर्थात पाकिस्तान आपल्या उत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग, केवळ कर्जफेडीवरच खर्च करत आहे. नाकी, शिक्षण, आरोग्य अथवा महागाई नियंत्रणा सारख्या मुद्द्यांवर.

चिकू म्हणजे 'सुपर  फ्रूट', रोज खा...! 

Click Here