रोज ३० मिनिटे अनवाणी चालला तर काय होईल? रिसर्चमधून खुलासा
सध्या लोकांनी अनवाणी चालणे सोडून दिले आहे. काही लोक घरातही चप्पल घालतात
अनवाणी चालण्याचे फायदे खूप कमी जणांना माहिती आहेत. शरीरासाठी अनवाणी चालणे किती गरजेचे आहे हे एका रिसर्चमधून पुढे आले
जर तुम्ही दिवसाला ३० मिनिटे अनवाणी चालत असाल तर आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे. त्यामुळे मानसिक तणाव बराच कमी होतो
एका रिसर्चनुसार, दररोज जमिनीवर अनवाणी चालल्याने शरीरातील जळजळ कमी होते. झोप छान येते आणि तुमचा मूडही चांगला राहतो.
जेव्हा शरीर जमिनीच्या संपर्कात येते तेव्हा पृथ्वीवरून मिळणारे इलेक्ट्रॉन शरीरात अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करतात
अनवाणी चालल्याने मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. शरीरात जमा झालेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज बाहेर पडते आणि त्यामुळे कोर्टिसोलची पातळी (स्ट्रेस हार्मोन) कमी होतात
जेव्हा पायांची त्वचा जमिनीशी थेट संपर्कात येते तेव्हा रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हृदयाला पंप करणे सोपे होते. उच्च किंवा कमी रक्तदाबाच्या समस्या संतुलित होतात
अनवाणी चालल्याने पायाच्या स्नायू, अस्थिबंधन आणि घोट्याची हालचाल सुधारते. शरीराची लवचिकता वाढते. सांधेदुखी आणि स्नायूंच्या घट्टपणापासून आराम मिळतो