अन्न पदार्थांची चव वाढवणारा लसूण आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर आहे. मात्र, याचे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा तुम्ही तो योग्य पद्धतीने खाता.
तर जाणून घेऊयात, लसूण खाण्याची योग्य पद्धत, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्म फायदा घेता येईल.
बरेच लोक अख्खी लसनाची पाकळीच पाण्यासोबत गिळून घेतात. मात्र, डॉक्टरांच्या मते, ही पद्धत योग्य नाही. यामुळे त्याचे संपूर्ण फायदे मिळत नाहीत.
तज्ञांच्या मते, लसूण ठेचून अथवा बारीक करून खाणे अधिक फायदेशीर आहे. कारण, यात आढळणारे अॅलिसिन कंपाऊंड...
लसणामध्ये ते निष्क्रिय स्वरूपात (इनअॅक्टिव्ह फॉर्ममध्ये) असते, मात्र जेव्हा आपण लसूण बारीक करतो, तेव्हा ते हवेच्या संपर्कात येऊन सक्रिय स्वरूपात (अॅक्टिव्ह फॉर्ममध्ये) येते.
लसूण बारीक केल्यानंतर अथवा ठेचल्यानंतर, थेड्यावेळ तसाच ठेवा आणि नंतर त्याचे सेवन करा.
आपण लसणाची अखंड पाकळी खाल्ली अथवा गिळून घेतली, तर अॅलिसिन योग्य प्रकारे अॅक्टिव्ह होणार नाही आणि आपल्याला याचे संपूर्ण फायदे मिळणार नाहीत.
(टीप - आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...)