असा होता त्यांचा शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात एका शेतकरी कुटुंबात १८ मे १९५१ रोजी झाला.
धनखड यांचे प्राथमिक शिक्षण चित्तौडगड येथील एका सैनिक शाळेत पार पडले.
यानंतर, त्यांनी जयपूरमधील राजस्थान विद्यापीठांतर्गत महाराजा कॉलेजजमधून बीएसस्सी (ऑनर्स) फिकिक्सची पदवी मिळवली.
बीएस्सीनंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातूनच एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी १९७९ मध्ये राजस्थान बार काउंसिलमध्येही रजिस्ट्रेशन केले.
महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक खटले लढले.
जगदीप धनखड, हे आमदार आणि खासदारही राहिले आहेत. त्यांनी ३० जुलै २०१९ रोजी पश्चिम बंगालचे २१ वे राज्यपाल म्हणून शपथही घेतली होती.
सत्ताधारी एनडीएने जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पराभूत करत ते ११ ऑगस्ट २०२२ रोजी देशाचे उपराष्ट्रपदी बनले.
महत्वाचे म्हणजे, जगदीप धनखड यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात जनतादलापासून केली होती.
देशातील 'या' रेल्वे स्टेशन्सची नावं वाचून तुम्हीही चकित व्हाल!