विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत चोख व्यवस्था असते
जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर सुरक्षा तपासणीत प्रवाशांना बॅगमधून लॅपटॉप, टॅब्लेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट काढण्यास सांगितले जाते.
लॅपटॉप बॅगेत सुरक्षित असताना हे का केले जाते? हा प्रश्न अनेकांना पडतो, या प्रक्रियेमागील तांत्रिक कारणे काय हे जाणून घेऊया
विमानतळावर प्रवाशांच्या बॅगा तपासण्यासाठी एक्स-रे स्कॅनर मशीनचा वापर केला जातो. यात बॅगमधील साहित्य स्पष्टपणे दिसून येते
लॅपटॉपमधील धातू, बॅटरी, सर्किट आणि इतर इलेक्ट्रॉनिक भाग एक्स-रे इमेजमध्ये खूप दाट दिसतात. त्यामुळे इतर वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
जेव्हा प्रवाशांना लॅपटॉप किंवा टॅब्लेट वेगळ्या ट्रेमध्ये ठेवण्यास सांगितले जाते, तेव्हा एक्स-रे मशीनला प्रत्येक वस्तूची स्पष्ट प्रतिमा मिळते
यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांना लॅपटॉपमध्ये काही लपलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा बॉम्बसारखे घटक आहेत का ते पाहता येते
लॅपटॉपमध्ये लिथियम-आयन बॅटरी असतात, ज्या दाब किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यास स्फोट होऊ शकतात त्यामुळे त्या वेगळ्या ठेवल्या जातात