बेड विकत घेताना घाई न करता खालील ८ गोष्टी नक्की तपासा.
आपल्या बेडरुमच्या आकारानुसार बेड निवडा. चालण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहिल याची खात्री करा.
बेड प्रामुख्याने लाकूड, लोखंड किंवा इंजिनिअर्ड वुडमध्ये मिळतात.
आपली खोली खूप छोटी असेल तर बॉक्स बेडची निवड करा.
बेडवर बसल्यावर तुमचे पाय जमिनीला व्यवस्थित टेकले पाहिजेत याची काळजी घ्या.
जर तुम्हाला बेडवर बसून पुस्तक वाचायला किंवा लॅपटॉपवर काम करायला आवडत असेल, तर 'पॅडेड' किंवा 'कुशन' असलेला हेडबोर्ड निवडा.
बेड हलवताना किंवा त्यावर बसताना तो डगमगत नसावा. बेडच्या पायांची मजबुती तपासा, कारण संपूर्ण वजन त्यावर असते.
बेडची फ्रेम आणि मॅट्रेस यांचा आकार अचूक असावा. बेडमध्ये मॅट्रेस बसवल्यानंतर आजूबाजूला खूप जास्त रिकामी जागा नसावी.
फर्निचरमध्ये स्वस्त पर्याय नेहमीच टिकाऊ नसतात. त्यासाठी बेड निवडताना तो टिकाऊ निवडा.