पावसाळ्यात हवामान छान असते म्हणून अनेक जण सहलींचे नियोजन करतात.
पावसाळ्यात चांगले हवामान असल्याने काही लोक सहलींचे नियोजन करतात. परंतु या हंगामात सहलीला जाणे देखील धोक्याचे ठरु शकते.
पावसाळ्यात जेव्हा तुम्ही सहलीची नियोजन करत असता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा.
पावसाळ्यात कुठेही सहलीला जाण्यापूर्वी, त्या ठिकाणाची सर्व माहिती नीट जाणून घ्या.
या हंगामात, ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त असतो, पूर येण्याची शक्यता असते आणि भूस्खलनाचा धोका असतो अशा ठिकाणी जाणे टाळा.
जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या हिल स्टेशनवर सहलीला जात असाल तर तिथल्या मार्गाची आधीच माहिती घ्या.
सहलीत जिथे जिथे राहायचे असेल तिथे तिथे आधीच नियोजन करा.
प्रवासात कमीत कमी सामान सोबत ठेवा. २ पेक्षा जास्त बॅगा नकोत.
पावसाळ्यात प्रवास करताना, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांचे आणि रुग्णालयाचे क्रमांक तुमच्याकडे ठेवा.