माजी पंतप्रधान प्रेमात,
किस करताना कॅमेऱ्यात कैद

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा यॉटवर कोणासोबत रोमान्स?

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांचे एका गायिकेला किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गायिका कॅटी पेरी हिला जस्टिन ट्रुडो डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. ट्रुडो आणि कॅटी पेरी यांचे एका यॉटवरील फोटोच प्रसिद्ध झाले आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जस्टिन ट्रुडो आणि कॅटी पेरी एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत.

दोघेही कॅलिफोर्नियातील सांता बारबरा येथील एका यॉटवर दिसले. डेली मेलच्या रिपोर्टनुसार दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत होते.

कॅटी पेरी बिकिनीवर असून, ट्रुडोही शर्टलेस आहेत. दोघेही यॉटवर उभे होते. त्यांचे एकमेकांना किस करतानाचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले.

कॅटी पेरी आणि माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो रोमँटिक अंदाजात दिसले. दोघेही डेटिंग करत असल्याच्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होत्या.

जस्टिन ट्रुडो यांनी त्यांची पत्नी सोफी यांच्या घटस्फोट दिला आहे. ट्रुडो यांना तीन मुले आहेत. कॅटी पेरीनेही रसेल ब्रॅण्डसोबत लग्न केले होते.

दोन वर्षे सोबत राहिल्यानंतर कॅटी पेरी आणि रसेल एकमेकांपासून वेगळे झाले. पेरी ऑरलेंडो ब्लूम सोबतही काही काळ रिलेशनमध्ये होती.

धनत्रयोदशी स्पेशल : सोने खरेदीचे ५ स्मार्ट मार्ग!

Click Here