रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून बेडशीट, उशी व ब्लॅकेट दिले जाते.
मात्र, या वस्तू केवळ प्रवासादरम्यान वापरण्यासाठीच असतात परंतु काही लोक या वस्तू घरी नेतात. हा चोरीचा प्रकार असून, दोषींवर रेल्वेकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
रेल्वेच्या एसी डब्यांमधून प्रवासी टॉवेल, बेडशीट, कंबल, साबण इत्यादी वस्तू घरी नेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे दरवर्षी हजारो कोटींचे नुकसान होत आहे.
रेल्वे कायदा १९६६ च्या कलम ३ अंतर्गत, कोणत्याही रेल्वे मालमत्तेची चोरी, नुकसान किंवा गैरवापर हा गंभीर गुन्हा मानला जातो.