रक्त वाढेल, चेहराही उजळेल; हिवाळ्यात बीटाचे जबरदस्त फायदे
बीट हे आयरन, अँटीऑक्सीडेंट आणि विटामिन सीने समृद्ध असते.
बीट खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. बीटाचे सरबत किंवा बीटाचा हलवा आपण हेच पदार्थ आजपर्यंत खात आलो.
मिक्सरमध्ये बीटाचे पातळ मिश्रण करा त्यात बेरीज, सब्जा, मध घालून पुन्हा एकदा ढवळून घ्या.
सफरचंद व बीटाचे सलाड बीट व सफरचंदाचे तुकडे करा. त्यात पालक, लिंबू व मध घाला. या सर्वांचे एकत्रीकरण करून खा, हे लिव्हरची कार्यक्षमता वाढवते, पचनक्रिया सुरळीत होते.
दह्यासोबत बीटाचे तुकडे मिक्स करून घ्या, त्यावर जिरं किंवा मोहरीची फोडणी घालून तुम्ही खाऊ शकता. त्यामूळे शरीराला थंडपणा येतो मुरुमे,पिंपल्स निघून जायला मदत होते.
बीटाची स्मूदी बीट मिक्सरमधून पातळ करून घ्यावे, त्यात दही, केळं, हे शरीराला हायड्रेट करते; त्यामुळे रुक्ष ओलसर होते व चमकदार दिसते.
बीटरूट सूप एका कुकरमध्ये बीटाचे तुकडे, लसूण, काळी मिरी, आलं मिरची टाकून ते शिजवून घ्यावे व मिक्सरला लावावे; हे सूप त्वचेसाठी खूप चांगले असते.
बीट व गाजराचा ज्यूस बीट, गाजर, लिंबू या सगळ्याचे मिश्रण करून ज्यूस बनवावे. यातून खूप व्हिटॅमिन्स मिळतात; रक्तप्रवाह वाढतो. यकृताचे कामसुद्धा सुधारते.