लॅपटॉपचे स्पीड वाढण्यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत.
तुमच्या लॅपटॉपचा वेग कमी झाला आहे का? स्पीड वाढण्यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगतो, यामुळे तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढेल.
लॅपटॉपचे स्पीड कमी होण्यामागे फक्त एक नाही तर अनेक मोठी कारणे आहेत.
जर लॅपटॉपचे स्पीड कमी झाला असेल, तर तुम्ही हार्ड ड्राइव्हला SSD ने बदलू शकता, सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) चा वेग हार्ड डिस्कपेक्षा जास्त असतो.
जर लॅपटॉपची रॅम कमी असेल तर रॅम वाढवा, यामुळे लॅपटॉप मल्टीटास्किंग चांगले करू शकेल.
आवश्यक नसलेले प्रोग्राम आणि फाइल्स डिलीट करा, पूर्ण स्टोरेजमुळे लॅपटॉपचे स्पीड देखील कमी होते.
व्हायरस आणि मालवेअर तुमच्या सिस्टमची गती कमी करू शकतात, सर्वोत्तम अँटीव्हायरस वापरा आणि संपूर्ण सिस्टम स्कॅन करा, आढळल्यास व्हायरस त्वरित काढून टाका.
टेम्पररी फाइल्समुळे स्पीड कमी होते, या फाइल्स क्लियर करत रहा, Ctrl+R दाबा आणि नंतर %temp% लिहा आणि एंटर दाबा.