तुमचा iPhone खरा की खोटा? जाणून घ्या...

iPhone खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते.

Amazon आणि Flipkart वरील सेलमध्ये मोबाईल फोन्सवर उत्तम डील मिळते. iPhone सारख्या हाय-एंड मॉडेल्सवरही मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. 

म्हणूनच मोठ्या संख्येने लोक ऑनलाईन आयफोन ऑर्डर करतात. पण इतक्या स्वस्तात फोन मिळाल्याने तो बनावट तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडतो.

तुमचा आयफोन खरा आहे की बनावट, हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. याद्वारे तुम्ही तुमचा फोन घरबसल्या तपासू शकता. 

सर्वात आधी बॉक्सवरील सीरियल नंबर Apple च्या अधिकृत वेबसाइटवर टाका. तिथे "Device not activated" दिसले तर तो एकदम नवीन आणि खरा iPhone आहे.

मॉडेल नंबर M ने सुरू असेल तर फोन नवीन आहे. F म्हणजे Refurbished, N म्हणजे Replacement, तर P म्हणजे Personalized डिव्हाइस आहे.

खरा iPhone नेहमीच प्रीमियम लुक आणि परफेक्ट फिनिशिंगसह येतो. फिनिशिंग जवळून पाहिल्यास आयफोन नवीन आहे की, जुना हे कळू शकते. 

Click Here