जवळचा माणूस खरा आहे की खोटा? चाणक्यंनी सांगितलं असं ओळखा
आपल्या जवळची लोक अनेकदा दगा देतात.
प्राचीन भारताचे महान विद्वान आचार्य चाणक्य यांच्या नीती आजही जीवनात आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.
‘नीतिशास्त्र’मध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीची पारख कशी करावी.
सोन्याची शुद्धता जशी त्याला घासून, कापून, गरम करून आणि मारून तपासली जाते, त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाची पारख चार गोष्टींच्या आधारावर केली जाते.
चाणक्य नीतीनुसार, एका चांगल्या पुरुषाची ओळख त्याच्या दान करण्याच्या प्रवृत्तीतून होते. एक खरा आणि सच्चा माणूस दानधर्म करण्यास कधीही कचरत नाही.
उत्तम व्यक्तीची ओळख त्याच्या स्वभावातून आणि वागणुकीतून होते. जे लोक विनयशील, व्यवहारकुशल आणि मृदुभाषी असतात, ते सहजपणे सर्वांच्या मनात स्थान मिळवतात.
जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीची पारख करायची असेल, तर त्याच्यातील गुणांवर लक्ष द्या. सच्चे आणि चांगले गुण असलेल्या व्यक्तीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
उत्तम पुरुषाची चौथी आणि महत्त्वाची ओळख म्हणजे त्याचे आचरण. वाईट आचरण असलेला व्यक्ती कधीही कोणाचे भले करू शकत नाही.