कॅल्शियमचे अति सेवन हृदयासाठी धोकादायक? जाणून घ्या

कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर असले तरी त्याचे अति सेवन धोका वाढवू शकते. 

मजबूत हाडे आणि उत्तम स्नायुबलासाठी कॅल्शियमची गरज असते. मात्र, त्याचे कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यास फायदे होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.

शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम हाडांऐवजी धमन्यांमध्ये साचते. मग त्यामुळे धमन्या कडक होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

दूध, पालेभाज्या, तीळ व बियांसारख्या अन्नातून मिळणारे कॅल्शियम शरीरात हळूहळू शोषले जाते आणि ते सुरक्षित असते. 

पण, गोळ्यांच्या स्वरूपातील पूरक कॅल्शियम अचानक रक्तात वाढते, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.

अतिरिक्त कॅल्शियममुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या झडपांमध्ये कॅल्सिफिकेशन होते. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.

अतिरिक्त कॅल्शियममुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या झडपांमध्ये कॅल्सिफिकेशन होते. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.

अनेक संशोधनांनुसार, अन्नातून मिळणारे कॅल्शियम सुरक्षित असते. परंतु, गोळ्यांमधील जास्त कॅल्शियममुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊन, ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात.

अनेक संशोधनांनुसार, अन्नातून मिळणारे कॅल्शियम सुरक्षित असते. परंतु, गोळ्यांमधील जास्त कॅल्शियममुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊन, ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात.

Click Here