पाच दशकांपूर्वी मित्र असलेले इस्रायल आणि इराण हे आज एकमेकांशी लढत आहेत. दोघांमध्ये २,५०० किमी अंतर असूनही युद्ध पेटलं आहे.
इस्रायल ज्यू राष्ट्र आहे आणि इराण इस्लामिक. इराणमध्ये शिया पंथियांचे राज्य आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वैचारिक आणि धार्मिक संघर्ष आहे.
पॅलेस्टिनी संघटना 'हमास' आणि लेबनानी संघटना 'हिजबुल्ला' यांना इराणकडून आर्थिक व लष्करी रसद पुरवली जाते. हे दोन्ही गट इस्रायलवर हल्ले करतात.
इस्रायलला भीती आहे की इराण अण्वस्त्रे बनवत आहे आणि त्याचा थेट थोका इस्रायलला आहे.
इराणने हमास आणि हिजबुल्ला यांना मदत बंद करावी आणि अणू कार्यक्रम स्थगित करावा अशी इस्रायलची मागणी आहे.
तर इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना स्वातंत्र्य द्यावे आणि अतिक्रमण केलेल्या भूमीवरून माघार घ्यावी, अशी इराणची मागणी आहे.
इराण आणि इस्रायल एकेकाळी एकमेकांचे कट्टर मित्र होते. १९७९ साली इराणमध्ये क्रांती होण्यापूर्वी अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांनी सोबत मिळून काम केले होते.
त्यानंतर इराणमध्ये सत्तेवर आलेल्या कट्टरपंथी सरकारने अरब नागरिकांचे परंपरागत शत्रू असलेल्या इस्रायलला शत्रू राष्ट्र घोषित केले आणि उभय देशांतील मैत्री संपुष्टात आली.
इस्रायलकडे अमेरिकेचे बळ, आधुनिक तंत्रज्ञान, आणि सक्रिय गुप्तचर यंत्रणा आहे. इराणकडे मोठी क्षेपणास्त्रे क्षमता, क्षेत्रीय प्रभाव आणि प्रॉक्सी गटांचा पाठिंबा आहे.