योगा करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे? 

व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतरचा आहार कसा असायला हवा, जाणून घेऊया. 

आजच्या काळात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण योगा करतो. पण अशावेळी आहार कसा असायला हवा जाणून घेऊया. 

योगा करण्यापूर्वी आपण फळे खाऊ शकतो. यामध्ये नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते. 

आपण व्यायाम करण्यापूर्वी ओट्स किंवा दलिया खाऊ शकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करते. 

आहारात आपण ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे शरीरातील ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करतात. 

योगा केल्यानंतर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. ज्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. चीज,अंडी आणि डाळींचा समावेश करा. 

व्यायाम केल्यानंतर आहारात कडधान्य, लाल तांदूळ, बटाटे आणि ओट्स खा. यामध्ये शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. 

शरीराला हायड्रेट करण्यासाठी आपण नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिऊ शकतो. 

योगा केल्यानंतर आपण फळांचे किंवा भाज्यांचे सॅलड खायला हवे. ज्यातून पोषण तत्व मिळतील. 

नैसर्गिक सौंदर्य खुलवणारे  ५ योगाभ्यास!

Click Here