भारतातील सर्वात उंच बाप्पा, कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश

कोल्हापूर शहरात प्रवेश करण्याआधी टोप संभापूर येथील चिन्मय गणाधीशाचे दर्शन होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोप (संभापूर) गावाजवळ हे मंदिर आहे.

24 फूट उंच अशा ध्यानमंदिरावर विराजमान असलेली 61 फूट उंचीची गणपती मूर्ती आहे.

या मूर्तीचे वजन 800 टन इतके असून एकूण 24 खांब या गणेशमूर्तीला आधार म्हणून उभारले आहेत

ध्यानमंदिराची वास्तू वर्तुळाकार असून मंदिराचा व्यास सुमारे 60 फूट आहे.

या बाप्पाची मूर्ती कर्नाटकातील 50 कुशल कामगारांच्या मदतीने 18 महिन्यात तयार करण्यात आली.

19 नोव्हेंबर 2001 रोजी स्वामी तेजोमयानंद यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले

‘चिन्मय गणाधीश’ हे आता तीर्थक्षेत्र बनले असून संकष्टी चतुर्थीला हजारो लोक याठिकाणी भेट देतात.

दररोज सकाळी वैदिक मंत्रोच्चारासह बाप्पाची पूजा केली जाते व संध्याकाळी आरती केली जाते.

Click Here