जगप्रसिद्ध ग्लॅमरस जादूगर सुहानी शाहचं शिक्षण किती झालंय?

वयाच्या ७ व्या वर्षापासून आपल्या जादूची किमया दाखवून तिने प्रेक्षकांना मोहित केले

जादूगर सुहानी शाह हिला अलीकडेच इटलीत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर म्हणून प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला

या चॅम्पियनशिपला जादूचे ऑलिंपिक मानले जाते. हा जादूगारांसाठी सर्वात मोठा सन्मान आहे. यंदा FISM ने ऑनलाईन कन्टेंट क्रिएटर्ससाठी नवी कॅटेगिरी सुरू केली आहे

सुहानी शाहचा जन्म २९ जानेवारी १९९० मध्ये राजस्थानच्या उदयपूर येथे झाला. ती केवळ माइंड रिडर म्हणून नव्हे तर कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच म्हणूनही ओळखली जाते. 

वयाच्या ७ व्या वर्षी सुहानी शाहने १९९७ मध्ये अहमदाबाद येथे पहिला मॅजिक स्टेज शो केला. तिने आतापर्यंत ५ पुस्तके लिहिली आहेत

एका मुलाखतीत सुहानी शाहने पहिलीच्या वर्गापर्यंत शिक्षण घेतल्याचे म्हटले. खूप कमी वयात तिने जादूच्या दुनियेत पाऊल ठेवले त्यामुळे शालेय शिक्षण अर्धवट राहिले

सुहानी हिच्या १८० मिनिटांच्या जादू शोचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एखाद्याच्या मनात काय चालले आहे किंवा त्याच्या किंवा तिच्या भूतकाळातील गुपिते उलगडणे हे आहे

सुहानी शाह हिने गेल्या २० वर्षांमध्ये भारतासह परदेशातही शो केले आहेत. तिच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आलेली आहे.

Click Here