कधी गहू थांबवला, कधी शस्त्रे, टॅरिफची धमकी; भारत झुकला नाही
अमेरिकन सत्तेला यापूर्वी भारताने दिलंय आव्हान
भारत-अमेरिकेचे संबंध यापूर्वीही सुरळीत राहिलेले नाहीत. स्वातंत्र्यापासून, भारताने अनेकदा अमेरिकेच्या दबावांना प्रतिकार केला आहे.
भारताने नेहमीच दाखवून दिले आहे की आमची धोरणे स्वावलंबी आणि स्वतंत्र आहेत, मग समोर कोणतीही महासत्ता असो.
१९६५ च्या अन्न संकटापासून ते १९९८ च्या अणुचाचण्या आणि ट्रम्प प्रशासनाच्या शुल्कापर्यंत, भारताने कधीही आपल्या धोरणात्मक सार्वभौमत्वाशी तडजोड केलेली नाही.
प्रत्येक दशकात, भारताने अमेरिकन दबावांना धैर्याने तोंड दिले आणि दूरदृष्टीने निर्णय घेतले. १९५०-६० च्या दशकात जेव्हा भारताने अलिप्त धोरण स्वीकारल्यानंतर हे सुरु झाले.
अमेरिकेला ही भूमिका आवडली नाही, पण पंडित नेहरूंनी स्पष्ट केले की भारत कोणाच्याही आदेशाचे पालन करणार नाही.
१९६५ मध्ये जेव्हा भारत पाकिस्तानशी युद्ध करत होता, तेव्हा देशाला अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता. अमेरिका पीएल-४८० योजनेअंतर्गत भारतात गहू पाठवत असे.
युद्धाच्या मध्यभागी अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी धमकी दिली की जर भारताने युद्ध थांबवले नाही तर गव्हाचा पुरवठा थांबवला जाईल.
त्यावेळी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 'गहू पुरवठा थांबवा, असं म्हटलं आणि देशवासीयांना आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले.
१९७४ मध्ये, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने पहिली अणुचाचणी केली. अमेरिकेने लगेचच निर्बंध लादले, पण भारत मागे हटला नाही.
१९९८ मध्ये, अटलबिहारी वाजपेयी सरकारने पोखरणमध्ये पुन्हा पाच अणुचाचण्या केल्या. अमेरिकेने कठोर आर्थिक निर्बंध लादले, पण भारताने आपले धोरण स्पष्ट केले.
ट्रम्प प्रशासनानेही भारतावर २५% कर लादला. भारताने प्रत्युत्तरात्मक कर लादला नाही, तर संयम दाखवला. पण व्यावसायिक स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे स्पष्ट केले.