भारतीय चहाची जगाला लागली गोडी; कोणत्या देशात किती होते निर्यात?
जगाच्या जिभेवर रेंगाळतेय भारतीय चहाची अस्सल चव
भारताने चहा निर्यातीच्या जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे.
भारतातून होणारी चहा निर्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत २५४६.७ लाख किलोवर पोहोचली आहे.
यातून भारताला ७,१११.४३ कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली असून, २०२३ च्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे.
एकूण निर्यातीत सर्वाधिक चहाची निर्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते, ती म्हणजे १७.९ टक्के. त्यापाठोपाठ अमेरिकेत १०.३ टक्के.
इराकमध्ये ८.९ टक्के निर्यात होते, तर ब्रिटन आणि रशियामध्ये प्रत्येकी ७.५ टक्के निर्यात होते. जर्मनीमध्ये ४.८ टक्के, इराणमध्ये ४.२ टक्के इतका चहा निर्यात होतो.
टी बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातून सौदी अरेबियामध्ये ३.८ टक्के, तर चीनमध्ये ३.१ टक्के चहाची निर्यात होते.