लहान मुलांमध्ये 'हँड, फूट, माउथ सिंड्रोम'चे वाढते प्रमाण
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये 'हँड, फूट, माउथ सिंड्रोम' या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत
या आजाराची लक्षणे प्रथम कांजिण्यासारखी वाटतात, ताप, घसा खवखवणे, चेहऱ्यावर व हातपायांवर पुरळ, पुळ्या आणि चिडचिड असा त्रास होतो
वारंवार हात धुणे, संक्रमित मुलांना इतरांपासून दूर ठेवणे, सार्वजनिक वस्तू स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे
HFMD साठी ठोस औषध नसले तरी, ताप व वेदनांवर उपचार केले जातात. भरपूर पाणी, थंड व मऊ आहार द्यावा
'हँड, फूट, माउथ सिंड्रोम' हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. संसर्ग लाळ, शिंका, खोकला, फोडातील स्राव, तसेच दूषित भांडी, खेळणी, रुमाल यांच्याद्वारे पसरतो.
गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः डेकेअर, शाळा, प्ले ग्रुपमध्ये त्याचा धोका अधिक असतो. तो संक्रमित व्यक्तीच्या तोंडातील स्राव, फोडांमधील द्रव, शिंकणे किंवा खोकण्याद्वारे पसरू शकतो
विषाणू असलेल्या वस्तूंना स्पर्श करून नंतर तोच हात तोंडाला लावल्यास होऊ शकतो.