या देशातील लोक वेळेला महत्व देतात; रेल्वे ३० सेकंदांपेक्षा जास्त लेट नसते

जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते.

जपान हा आशियातील सर्वात विकसित देश मानला जातो. येथील लोक जगातील सर्वात मेहनती मानले जातात. 

जपानमधील लोक वेळेला खूप महत्व देतात, कोणतेही काम वेळेवर करण्यासाठी जगभरात ओळखले जातात.

जपानमध्ये धावणाऱ्या गाड्या देखील ३० सेकंदांपेक्षा जास्त उशिरा येत नाहीत.

मुलांना १० वर्षांचे होईपर्यंत कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागत नाही. या १० वर्षांत त्यांना बालपणीचे जीवन उपभोगण्याची संधी दिली जाते.

जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलणे किंवा एखाद्या गोष्टीचा वास घेणे हे असभ्य मानले जाते.

एवढेच नाही तर दोन व्यक्तींनी हात धरून एकत्र चालणे देखील चांगले मानले जात नाही. 

जपानमध्ये, लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आधी मंदिरात जातात आणि १०८ वेळा घंटा वाजवतात.

जपान हा एक प्राचीन देश आहे. येथील रीतिरिवाज आणि परंपरा देखील खूप वेगळ्या आहेत. 

जपानमध्ये कोणत्याही व्यक्तीला आदराने वाकून अभिवादन करण्याची प्रथा आहे.

Click Here