आहारात करा सफरचंदाचा समावेश
सफरचंद खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन या समस्या दूर होतात.
किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करणं फायद्याचं ठरतं.
सफरचंदामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच दातांचं आरोग्यही राखलं जातं.
सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहारात एका तरी सफरचंदाचा समावेश करावा.
सफरचंदाच्या सेवनामुळे त्वचेची गुणवत्तादेखील सुधारते. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत मिळते.