छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग..!

प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला माहीत असायलाच हवेत!

1627 - पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आई जिजाबाईंनी शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव 'शिवाजी' ठेवले. शिवनेरी किल्ल्याची कुलदेवता शिवाई देवी आहे.

1643-47 - या काळाता शिवाजी महाराजांनी कोंडाणा, तोरणा आणि रायगड हे मोठे किल्ले हस्तगत केले.

1656 - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांकडून जावळी जिंकली.

1657 - शिवाजी महाराजांनी अहमदनगरवर छापे टाकल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा मोगलांशी थेट संघर्ष झाला.

1659 - शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी विजापूरच्या दरबाराने अफझल खानाला पाठवले होते, परंतु शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या लढाईत अफझल खानाचा पराभव करून विजय मिळवला.

1663 - शिवाजी महाराजांनी लाल महालात अचानक छापा टाकून शाइस्ता खानावर हल्ला केला आणि त्याला जखमी केले.

1665 - पुरंदर तहाच्या अटींनुसार शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते.

1670 - शिवाजी महाराजांनी मुघलांवर हल्ला चढवला आणि दुसऱ्यांदा सुरतेवर यशस्वी छापा टाकला.

1674 - रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्यांनी 'महाराजा छत्रपती' ही गौरवपूर्ण पदवी स्वीकारली.

1680 - शिवाजी महाराजांचे वयाच्या ५०व्या वर्षी रायगड येथे निधन झाले.

दातांना लागलेली कीड कशी घालवायची...? उपचार महागडे, उपाय सोपे...!

Click Here