पिंपळाच्या पानाने दूर होतील असंख्य शारीरिक समस्या
उन्हाळा सुरु झाला की गावाकडे प्रत्येक व्यक्ती पिंपळाच्या पारावर जाऊन झाडाच्या छायेत विसावतो.
उन्हाळ्यात तनामनाला गारवा देणारा पिंपळ हा बहुगुणी आहे. म्हणूनच, पिंपळाच्या पानाचे फायदे काय ते पाहुयात.
पिंपळाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे अनेक गंभीर आजारात त्याचा वापर केला जातो.
पिंपळाच्या पानांचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतो. हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ दूर होते.
वारंवार खोकला होण्याची समस्या असेल तर पिंपळाच्या पानांचा रस प्यावा. यामुळे खोकला दूर होतोच. सोबतच कफाचं प्रमाणही कमी होतं.
पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते. तसंच या रसामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या दूर करतो.
पिंपळाच्या पानांमुळे रक्त शुद्ध होतं. त्यामुळे या पानांचा रस प्यायल्यास रक्तातील अशुद्धता दूर होते वर चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर होतात.