ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर होणार आहे? घरूनच करा रिन्यू
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता
तुम्ही तुमच्या घरच्या आरामात तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करू शकता. तेही फक्त ४०० रुपयांमध्ये.
ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतरही ३० दिवसांसाठी वैध राहते. तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्याही दंडाशिवाय नूतनीकरण करू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूसाठी, तुमच्याकडे जुने ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, नूतनीकरण शुल्क पावती लागते.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. होम पेजवर तुम्हाला ड्रायव्हर्स/लर्नर्स लायसन्स लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
तुमचे राज्य निवडा. नवीन पेजवर तुम्हाला 'अर्ज फॉर डीएल रिन्यूअल' दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर फॉर्म १अ तळाशी दिसेल. त्याच्या शेजारी Continue वर क्लिक करा.
तिथे अर्ज किंवा विनंतीची माहिती द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करा. तुमचा फोटो आणि स्वाक्षरीही अपलोड करा.
आता शुल्क भरावे लागेल. काही राज्यांसाठी शुल्क ३०० रुपये असू शकते तर काहींसाठी ४०० रुपये असू शकते. शुल्काच्या पावतीची प्रिंटआउट घ्या.
यानंतर, काही दिवसांनी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर येईल. काही राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागू शकते.