फसवणूक टाळायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा, मोठे नुकसान होऊ शकते

ऑनलाइनद्वारे बँकेच्या खात्यातून पैसे गायब होत आहेत.

देशात फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत.

बँकिंगशी संबंधित फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, जर तुम्हाला ते टाळायचे असेल तर महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स फॉलो करा.

जर तुम्हाला तुमच्या फोनवर कोणताही अज्ञात संदेश किंवा तुमच्या ईमेलवर एखादा अटॅचमेंट आला तर त्यावर क्लिक करण्याची चूक करू नका.

साधा पासवर्ड तयार करणे टाळा, एक मजबूत पासवर्ड तयार करा आणि दर काही दिवसांनी पासवर्ड बदलत रहा.

बँकिंग अ‍ॅप्स फक्त अधिकृत अ‍ॅप स्टोअरवरूनच इन्स्टॉल करा, APK द्वारे अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा.

अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर अपडेट ठेवा कारण अपडेट्स तुमच्या सिस्टमची (फोन, लॅपटॉप) सुरक्षा मजबूत करतात.

मोफत वायफायच्या जाळ्यात अडकू नका, कारण मोफत वायफायच्या मागे लागून तुमचा फोन हॅक होऊ शकतो ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

बँकिंग अॅप वापरल्यानंतर, अॅपमधून लॉग आउट करा आणि Keep me signed in पर्याय अनचेक करा.

Click Here