समोर गवा दिसला तर वाचण्यासाठी काय करायचे?

जंगलाच्या वाटेने जात असताना आपल्याला अनेकवेळा गवा दिसतो. गवा दिसला तर आपण लगेच घाबरून जातो. 

पळू नका 
गवा आपल्याला शिकारी समजून पाठलाग करू शकतो.

आवाज करू नका
आरडा ओरडा केल्यास तो घाबरू शकतो आणि अचानक हल्ला करू शकतो.

त्याच्याजवळ जाऊ नका
तो दूर वाटला तरीही तो क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.

कॅमेरा फ्लॅश वापरू नका
फ्लॅशमुळे गवा चिडू शकतो. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ घेण्यासाठी प्रयत्न करु नका.

शांत राहा 
गवा समोर दिसल्यास शक्यतो हलू नका आणि गव्याच्या हालचाली निरीक्षण करा.

झाडं, दगड यांच्या आड लपा
दृष्टिकोनातून लपल्यास तो पुढे न येण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे अडोसा पाहून लपा.

रस्ता ओलांडू नका
जर तुम्ही जंगल ट्रेक करत असाल आणि गवा वाटेत आला असेल, तर तो बाजूला जाईपर्यंत थांबा.

Click Here