सध्या व्हॉट्सअॅप अनेकांचे अकाउंट बंद करत असल्याचे समोर येत आहे.
सध्या व्हॉट्सअॅप अनेकांचे अकाउंट बंद करत असल्याचे समोर येत आहे. पण, हे का होतंय?
व्हॉट्सअॅप दरमहा एक अहवाल प्रसिद्ध करते, ज्यामध्ये किती अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे याची माहिती दिली जाते.
पहिली चूक जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे चॅटिंग करताना समाजात द्वेष पसरवणारे काहीही करु नका, अन्यथा अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज फॉरवर्ड करण्याची चूक करु नका, जर कोणी तुमच्या अकाउंटची तक्रार केली तर तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते
व्हॉट्सअॅपवर अश्लील कंटेंट शेअर करण्याची चूक करू नका, जर दुसऱ्या वापरकर्त्याने तुमच्याबद्दल तक्रार केली तर तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते.
परवानगीशिवाय ग्रुपमध्ये युजर जोडण्याची चूक करु नका, जर तुमच्याबद्दल तक्रार आली तर तुमचे अकाउंट बॅन केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांना मेसेज पाठवण्याची चूक करु नका, अन्यथा तक्रार आल्यास व्हॉट्सअॅप तुमच्या अकाउंटवर कारवाई करु शकते.