स्पिती व्हॅली फिरायला जात असाल, तर 'या' गोष्टी नक्की करा.
स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेशात आहे, जी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
स्पिती व्हॅलीमधील एक प्राचीन आणि ऐतिहासिक बौद्ध मठ, 'की मठ'ला नक्की भेट द्या.
या ठिकाणच्या चंद्रताल तलावावर नक्की जा, ज्याचे निळे पाणी आणि शांत वातावरण मनाला मोहित करते.
पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यानात जाऊन वन्यजीवांना जवळून बघण्याचा अनुभव घ्या आणि हिम बिबट्याही बघा.
कुंजुममधून हिमालयाच्या विहंगम दृश्याचा आनंद घ्या आणि फोटोग्राफी करा.
स्पिती व्हॅलीमध्ये फिरायला जाताय, तर थुकपा आणि मोमोजसारख्या पारंपारिक स्पिती पदार्थांचा आस्वाद घ्या.
स्पितीच्या आव्हानात्मक रस्त्यांवर मोटारसायकलने प्रवास करणे खूप रोमांचक आहे.
स्पिती व्हॅलीमध्ये ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि राफ्टिंग सारख्या साहसी क्रियाकलापांचा देखील आनंद घ्या.
स्पिती व्हॅलीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मे ते ऑक्टोबर असतो. या कळत तिथले हवामान अनुकूल असते.