सिग्नलवर गाडी किती इंधन जाळते? चालू-बंद करायची की नाही...

प्रत्येक वेळी इंजिन बंद करणे योग्य नाही...

शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार लागणारे रेड सिग्नल यामुळे वाहनधारकांना बराच वेळ एकाच जागी थांबावे लागते. 

अशावेळी अनेकजण विचार करतात की, इंजिन चालू  ठेवल्यास किती इंधन जळते आणि इंजिन बंद करणे अधिक फायदेशीर ठरते का? 

एका लहान ते मध्यम आकाराच्या 1000cc ते 1500cc पेट्रोल कारचे इंजिन आयडिअलमध्ये एका तासात सुमारे ०.६ ते १.८ लिटर इंधन वापरते.

फक्त एका मिनिटासाठी आयडलिंग केल्यास कार साधारणपणे १० ते ३० मिलीलीटर इंधन वापरते.

काही वाहन उत्पादक कंपन्यांच्या मते, ३ मिनिटांचे आयडलिंग हे साधारणपणे १ किलोमीटर गाडी चालवण्याएवढे इंधन खर्च करते.

इंधन बचत, प्रदूषण आणि इंजिनचा कमीत कमी झीज विचारात घेतल्यास, वाहतूक तज्ज्ञ एक साधा नियम सांगतात: जर तुम्हाला ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी थांबावे लागणार असेल, तर इंजिन बंद करा.

आधुनिक फ्यूल इंजेक्टेड कारमध्ये, इंजिन पुन्हा सुरू करण्यासाठी लागणारे इंधन हे १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ आयडलिंगमध्ये जळणाऱ्या इंधनापेक्षा खूप कमी असते.

डिझेल किंवा पेट्रोल टर्बो इंजिन असलेल्या गाड्यांना, जास्त वेगाने चालवल्यानंतर लगेच बंद करण्यापूर्वी टर्बोला थंड होण्यासाठी काही सेकंद आयडलिंग करणे आवश्यक असू शकते. 

जर रेड सिग्नल किमान ३० सेकंद ते १ मिनिटांपर्यंत असेल, तर इंजिन बंद करणे हे निश्चितच इंधन वाचवणारे आणि पर्यावरणासाठी चांगले पाऊल आहे.

हे लक्षात घ्या...
जर वाहतूक खूप हळू सरकत असेल आणि तुम्हाला वारंवार काही सेकंदांसाठी थांबावे लागत असेल, तर प्रत्येक वेळी इंजिन बंद करणे योग्य नाही.

Click Here