दुसऱ्या प्रयत्नात सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवत त्या आयपीएस बनल्या
नवज्योत सिमी यांचा जन्म पंजाबजच्या गुरदासपूमध्ये २१ डिसेंबर १९८७ ला झाला. त्यांचं शिक्षण पाखोवालच्या मॉडल पब्लिक स्कूलमध्ये झालंय.
बालपणापासून आयपीएस अधिकारी बनण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. आधी त्या डॉक्टर होत्या आणि प्रॅक्टिस सुरू केली होती.
डॉक्टरी सोडून त्यांनी UPSC ची परीक्षा दिली, मग २०१६ मध्ये त्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या होत्या.
दुसऱ्या प्रयत्नात २०१७ मध्ये नवज्योत सिमी यांनी ७३५वी रॅकिंग मिळवत IPS अधिकारी बनल्या
२०१० मध्ये त्या लुधियानाच्या एका संस्थेतून BDS ची डिग्री घेऊन त्या डॉक्टर बनल्या होत्या.
नवज्योत सिमी यांनी २०२० साली व्हॅलेंटाइन डे ला IAS अधिकारी तुषार सिंगला यांच्यासोबत ऑफिसमध्येच लव्ह मॅरेज केलं होतं.
नवज्योत सिमी यांचा लुक कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे. कामाशिवाय लुकसाठीही त्या खूप चर्चेत असतात