IPL स्टार वैभव सूर्यवंशी टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार!

वैभवने राजस्थान रॉयल्ससाठी ३५ चेंडूत ठोकलं दमदार शतक

Vaibhav Suryavanshi: IPL 2025 मध्ये एक नाव गाजतंय. ते नाव म्हणजे RRचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी.

१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने चक्क ३५ चेंडूत शतक ठोकले. हे IPL इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

वैभव सूर्यवंशीने केलेल्या कामगिरीचे त्याला लवकरच फळ मिळणार आहे. तो टीम इंडियासोबत इंग्लंडला जाऊ शकतो.

आयपीएलनंतर भारताचा अंडर-१९ संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार आहे.

वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या U19 संघाकडून खेळला आहे. वैभवसोबतच आयुष म्हात्रेलाही संधी मिळणार आहे.

इंग्लंडविरूद्धचा हा दौरा ५ वनडे आणि दोन कसोटी सामन्यांचा असेल. यासाठी २१ जूनला संघ इंग्लंडला पोहोचेल.

Click Here