मॉडेलिंग करिअर सोडून बनली IAS अधिकारी; कोण आहे 'ही' युवती?

ग्लॅमरस दुनिया सोडून UPSC सारख्या कठीण परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

ही प्रेरणादायी कहाणी आहे प्रशासकीय अधिकारी तस्कीन खान हिची, जिने मिस इंडिया होण्याचे स्वप्न सोडून UPSC देण्याचा निर्णय घेतला

एक काळ होता जेव्हा ती मॉडेलिंग करिअरमध्ये पुढे गेली, तिच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही आल्या परंतु तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली

देहरादूनच्या तस्कीन खानला शैक्षणिक संघर्ष, वैयक्तिक आव्हाने आणि वारंवार अपयशांना तोंड द्यावे लागले आणि अखेर तिला यश मिळाले

ग्लॅमर इंडस्ट्रीला मागे टाकत तिने देशातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एकाला बसण्याचा निर्णय घेतला आणि चौथ्या प्रयत्नात ती UPSC परीक्षा उत्तीर्ण झाली

तस्कीनने तिच्या शैक्षणिक गुणवत्तेतील कमकुवतपणाला दूर करत दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले होते

२०१६-१७ साली मिस देहारादून आणि मिस उत्तराखंड खिताब पटकावलेल्या तस्कीनने २०२२ मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवले

ती केवळ अभ्यासात हुशार आणि दिसायला मॉडेल नाही तर ती बास्केटबॉल चॅम्पियन आणि राष्ट्रीय स्तरावरील डिबेटरदेखील आहे

Click Here