हायड्रोसील आणि हर्नियामध्ये काय फरक?

एकसारखेच दोन आजार; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार पद्धती.


अचानक पोटाच्या खालच्या भागात किंवा मांड्यांच्या वर सूज दिसली, तर मनात हायड्रोसील किंवा हर्नियाचा विचार येतो. 

दोन्ही आजारांची जागा आणि लक्षणे बरीच सारखी आहेत, ज्यामुळे नेमका रोग ओळखणे कठीण आहे. म्हणूनच फरक समजून घेणे महत्वाचे आहे.

हायड्रोसील- ही द्रवपदार्थाने भरलेली थैली आहे, जी अंडकोषांभोवती तयार होते. ही स्थिती सहसा त्या भागातील असंतुलनामुळे होते. 

हा आजार बहुदा नवजात मुलांमध्ये दिसून येते, परंतु कधीकधी वृद्ध लोकांमध्येही याची लक्षणे आढळतात. विशेषतः संसर्गामुळे ही समस्या उद्भवते.

हायड्रोसीलची लक्षणे- अंडकोष फुगू लागतो. ही सूज सहसा वेदनारहित असते, परंतु काही प्रकरणांमध्ये अंडकोषांचा मोठा आकार आणि सूज अस्वस्थता निर्माण करू शकते.

उपचार आणि शस्त्रक्रिया- शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. हायड्रोसेलेक्टोमी नावाच्या शस्त्रक्रियेत द्रव काढून टाकणे आणि थैली बंद केली जाते. 

हर्निया- जेव्हा एखादा अंतर्गत अवयव किंवा स्नायू कमकुवत होतो किंवा जागेतून किंवा छिद्रातून बाहेर पडतो तेव्हा हर्निया होतो. 

बहुदा खालच्या ओटीपोटात फुगलेल्या गाठीसारखे दिसतो. हर्निया अनेक ठिकाणी होऊ शकतो, परंतु सर्वात सामान्य म्हणजे इनग्विनल हर्निया (मांडीच्या वर).

हर्नियाची लक्षणे- प्रभावित भागात दिसणारा ढेकूळ किंवा फुगवटा जो तुम्ही खोकल्यावर, जड वस्तू उचलताना किंवा ताणल्यावर अधिक लक्षात येतो.


शारीरिक हालचालींदरम्यान गाठीच्या ठिकाणी वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. शस्त्रक्रियेद्वारे हा बरा केला जाऊ शकतो. 

Click Here