दातांना लागलेली कीड कशी घालवायची...? 

उपचार महागडे, उपाय सोपे...!

दात किडणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आजकाल सर्वांचेच दात किडताना दिसत आहेत.

आजकाल दातांची कीड घालवण्यासाठी अनेक महागडे उपचारही आले आहेत. यासाठी खूप पैसे खर्च करावा लागतो.

जर तुमच्या दातांना कीड लागली असेल, तर तुम्ही हटवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे आराम मिळेल.

ऑईल पुलिंग अथवा 'तेलाने चूळ भरणे' हा कॅविटी घालवण्याचा सर्वात जुना मार्ग आहे. यात, तोंडात नारळ अथवा तीळाचे तेल ठेवा आणि नंतर चुळ भरा.

कोरफडीचे जेल टूथ कॅविटी तयार करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. कोरफडीचे जेल टी ट्री ऑईलमध्ये मिसळून लावा.

लवंग कॅविटी घालवण्यास मदत करू शकते. कॅविटी असलेल्या दातांत लवंग तेल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या.

तुरटी पावडरमध्ये सैंधव मीठ मिसळा आणि दात घासा. असे केल्याने दातांची कीड दूर होईल.

मोहरीच्या तेलात मीठ मिसळा आणि कॅविटी असलेल्या दातांवर घासून घ्या. यामुळे दातदुखीपासूनही आराम मिळेल.

दातांमधील कॅविटी टाळण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश नक्की करा. यामुळे तुमचे दात स्वच्छ राहतील. (टीप - आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!)

दुधी भोपळा: वजन घटवण्याचा नैसर्गिक मार्ग...! 

Click Here