कॉफी वॉटर ठरेल केसांसाठी वरदान

केसांच्या आरोग्यासाठी कॉफी वॉटर रिन्स हा सोपा घरगुती उपाय आहे.

कॉफीमधील कॅफीन टाळूच्या पेशींमध्ये जाऊन रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केस गळती थांबते आणि नवीन केस येतात. 

कॉफी वॉटर रिन्स तयार करण्यासाठी २ कप पाणी आणि २ मोठे चमचे इन्स्टंट कॉफी घ्या. 

पाणी उकळायला ठेवा त्यात कॉफी पावडर घाला. २ ते ३ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा. 

पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बाटलीत भरुन केसांना लावा. 

सर्वात आधी केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवून घ्या. ज्यामुळे टाळूवरील घाण आणि तेल निघून जाईल.

ओल्या केसांवर मुळांपासून टोकापर्यंत कॉफीचे पाणी ओता किंवा स्प्रे करा. 

५ मिनिटे बोटांच्या टोकांनी हलका मसाज करा. यामुळे कॅफीन मुळांपर्यंत पोहोचते. 

साध्या कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. पुन्हा शाम्पू लावू नका.

Click Here