क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा?

अजूनही अनेकांना क्रेडिट कार्डचा योग्य वापर करता येत नाही.

क्रेडिट कार्डवर फक्त तेवढाच खर्च करा, जेवढे पैसे तुम्ही सहज परतफेड करू शकता.

क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेपूर्वी पूर्ण भरा. यामुळे व्याज लागत नाही आणि क्रेडिट स्कोअर चांगला राहतो.

नियमित आणि वेळेवर बिले भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे सोपे होते.

तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण मर्यादेपैकी ३०% पेक्षा जास्त वापर टाळा. उदाहरणार्थ, १ लाख लिमिट असेल तर ३० हजारांपेक्षा जास्त खर्च करू नका.

प्रत्येक महिन्याचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काळजीपूर्वक तपासा, त्यात काही चुकीचा व्यवहार नाही ना याची खात्री करा.

क्रेडिट कार्डसोबत जोडलेली वार्षिक शुल्क, उशिरा बिल भरण्याचे शुल्क आणि इतर छुपे शुल्क समजून घ्या.

क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढणे टाळा, कारण त्यावर लगेच जास्त व्याज लागते आणि शुल्कही जास्त असते.

तुमच्या क्रेडिट कार्डवर मिळणारे पॉइंट्स, कॅशबॅक आणि इतर सवलतींचा योग्य वापर करा.

Click Here

Your Page!