कमी खर्चात बेस्ट पर्यटन कसं करायचं? १० सर्वोत्तम टिप्स

या टिप्सचा वापर करून तुम्ही कमी पैशातही चांगल्या प्रकारे प्रवास अनुभवू शकता.

प्रवासाचे नियोजन केले तर तुमचे हजारो रुपये वाचतील. उदा. आगाऊ ट्रेन, विमान किंवा हॉटेल बुकिंग स्वस्त पडते.

ऑफ सिझनमध्ये प्रवास केल्यास पर्यटन स्थळांवर गर्दी कमी असते. शिवाय विमान आणि हॉटेलचे दरही कमी असतात. फक्त हवामानाची माहिती घ्या.

विमान प्रवासाऐवजी ट्रेन किंवा बसचा पर्याय विचारात घ्या. शहरांमध्ये फिरण्यासाठी सार्वजनिक वाहतूक (बस, मेट्रो) वापरा किंवा चालण्याचा आणि सायकलचा पर्याय निवडा.

महागड्या हॉटेल्सऐवजी हॉस्टेल्स, गेस्ट हाऊस, होमस्टे किंवा बजेट हॉटेल्सचा विचार करा. Airbnb सारख्या वेबसाइट्सवर चांगले आणि स्वस्त पर्याय मिळू शकतात.

बाहेर महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्याऐवजी स्थानिक ढाब्यांवर किंवा लहान खानावळींमध्ये जेवा. स्वतःसाठी काही तयार अन्न सोबत ठेवा किंवा जिथे स्वयंपाक करण्याची सोय असेल, तिथे राहा.

अनेक शहरांमध्ये विनामूल्य फिरण्याची आणि पाहण्याची ठिकाणे असतात, जसे की उद्याने, ऐतिहासिक इमारतींचे बाह्य दृश्य, सार्वजनिक कला प्रदर्शन. त्यांची माहिती मिळवा.

स्थानिक लोक तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या ठिकाणांची माहिती देऊ शकतात, मग ते खाण्याचे असो किंवा फिरण्याचे.

स्थानिक बाजारपेठ आणि दुकानांमध्ये बार्गेनिंग करुन खरेदी करू शकता. फक्त वाद होणार नाही, याची काळजी घ्या.

कमी सामान घेऊन प्रवास केल्यास तुमचे मेहनत आणि पैसे दोन्हींची बचत होईल.

प्रवासाला निघण्यापूर्वी खर्चाचा अंदाज बांधा आणि त्यानुसार रोजचा खर्च नियंत्रित ठेवा. अनावश्यक खरेदी टाळा.

Click Here