पाळीव श्वानाला कसं ट्रेनिंग द्याल? खास टिप्स

जर तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही त्याला घरातच ट्रेनिंग देऊ शकता! 

आजकाल बहुतेक लोकांना घरी पाळीव प्राणी पाळण्याची आवड आहे. बरेच लोक कुत्रे, मांजरी, पोपट, ससे पाळतात.

काही लोकांना कुत्रे पाळण्याची विशेष आवड असते. कुत्रे अनेक प्रजातींमध्ये येतात, जे गोंडस आणि बुद्धिमान असतात. कुत्रे निष्ठावंत देखील असतात.

जर तुमच्या घरात पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही त्याला कसे प्रशिक्षण देऊ शकता? 'या' खास टिप्स तुमच्यासाठी...

सर्वात आधी, तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी एक गोंडस नाव ठरवा. मग त्याला त्या नावाने हाक मारायला सुरुवात करा. अशा प्रकारे तो त्याचे नाव ओळखेल.

कुत्र्याला त्याच्या प्रजातीनुसार आणि वेळेवर योग्य अन्न द्या. अशा प्रकारे, त्याला तुम्ही आवडू लागला आणि तो तुम्हाला ओळखू लागेल.

सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी कुत्र्याला फिरायला घेऊन जा. यामुळे श्वानाला तुमच्यासोबत आणखी मैत्री करता येईल.

कुत्र्याला हस्तांदोलन करायला शिकवा. त्याच्यासमोर तुमचा हात पुढे करा, तो त्याचे पाय तुमच्या हातात नक्की ठेवेल.

तुमच्या कुटुंबाशी कुत्र्याचा संवाद वाढवा. अशा प्रकारे, कुत्रा रागावणार नाही किंवा कुटुंबातील सदस्यांना चावणार नाही.

पाहुणा आल्यावर कुत्रा भुंकत असेल तर त्याला प्रेमाने आणि मायेने शांत करा.

जर तुम्ही कुत्रा पाळत असाल, तर त्याच्या लसींबद्दल आधीच माहिती घ्या आणि त्याला लस द्या

Click Here