लॅपटॉपची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या...

लॅपटॉप काळाची गरज बनली आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी याचा वापर केला जातो.

स्वच्छता- लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड नियमितपणे मायक्रोफायबर कापडाने पुसा. धूळ आणि घाण जमा होऊ देऊ नका.

ओव्हरहीटिंग- लॅपटॉप वापरताना मांडीवर किंवा गादीवर ठेवू नका. योग्य एअर व्हेंटिलेशनसाठी कूलिंग पॅड वापरा.

बॅटरीची काळजी घ्या- बॅटरी नेहमी 20% ते 80% दरम्यान चार्ज ठेवा. सतत चार्जिंगवर लावून ठेवणे टाळा.

डेटा सुरक्षित ठेवा- अँटीव्हायरस वापरा आणि वेळोवेळी डेटा बॅकअप घ्या. क्लाऊड स्टोरेजचा वापर फायदेशीर ठरेल.

योग्य चार्जर वापरा- नेहमी ओरिजिनल चार्जरच वापरा. लोकल चार्जरमुळे बॅटरी व मदरबोर्ड खराब होऊ शकतो.

योग्य प्रकारे शटडाउन करा- काम पूर्ण झाल्यावर लॅपटॉप शटडाउन किंवा हायबरनेट करा. जबरदस्तीने बंद करू नका.

नियमित अपडेट्स करा- ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करा. यामुळे लॅपटॉप सुरक्षित राहतो आणि परफॉर्मन्स सुधारतो.

पासवर्ड व सिक्युरिटी ठेवा- लॅपटॉपला नेहमी पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी सारखे सुरक्षा फीचर्स द्या. डेटा सुरक्षित राहील.

स्टोरेज- अनावश्यक फाईल्स, सॉफ्टवेअर व जंक डेटा वेळोवेळी डिलीट करा. हार्डड्राइव्ह/SSD रिकामी ठेवल्यास स्पीड वाढतो.

हार्डवेअर सर्व्हिसिंग- वर्षातून एकदा लॅपटॉप प्रोफेशनल सर्व्हिस सेंटरमध्ये क्लिनिंग करून घ्या. आतल्या धुळीमुळेही लॅपटॉप स्लो होतो.

Click Here