ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
सर्वप्रथम UPSC चा सविस्तर अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत नीट समजून घ्या. काय विचारले जाते हे कळले की तयारी योग्य दिशेने सुरू होते.
इयत्ता 6वी ते 12वीच्या NCERT पुस्तकांपासून अभ्यास सुरू करा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान ही मूलभूत पुस्तके आहेत.
प्रत्येक विषयासाठी 1-2 पुस्तके ठेवा. उदा. इतिहास: Spectrum, भूगोल: GC Leong, राज्यशास्त्र: Laxmikanth आणि अर्थशास्त्र: Ramesh Singh
चालू घडामोडींसाठी दररोज एक विश्वासार्ह वृत्तपत्र वाचा आणि मासिक करंट अफेअर्स मॅगझिनचा अभ्यास करा.
Mains साठी लवकरच उत्तरलेखन सुरू करा. त्यामुळे मांडणी, वेळ व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढतो.
Prelims आणि Mains साठी मॉक टेस्ट सोडवा आणि वारंवार रिव्हिजन करा. अभ्यास केलेली माहिती टिकवण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.
इतरांशी तुलना न करता स्वतःचा स्टडी प्लॅन, दैनंदिन वेळापत्रक आणि सातत्य राखा. UPSC ही ज्ञानापेक्षा शिस्त आणि संयमाची परीक्षा आहे.