कोण म्हणतो हार्ट अटॅक सांगून येत नाही..., एकच गोष्ट कारण...

हार्ट अटॅकपासून वाचायचे असेल तर डॉक्टर म्हणतात...

सध्या वृद्ध तरुणच नाही तर लहान मुलांना देखील हृदयविकाराचा झटका येत आहे. 

आरोग्य तज्ञांनुसार याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जमलेले कोलेस्ट्रॉल. 

हे आधीही होत होते, आताही आहे. परंतू त्यात एक मोठा फरक आहे. 

कोलेस्ट्रॉल आधी नियंत्रणात असायचे, आता ते कोणाच्याच नियंत्रणात नाही. 

कारण जीवनशैली, खाद्यपदार्थ, जंक फुड आणि आरामदायीपणाची सवय. तेव्हा नव्हती, आता सर्वांनाच झाली आहे. 

तुम्हाला जर या पासून वाचायचे असेल तर काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. ज्या डॉक्टरांनीच सांगितल्या आहेत. 

तुम्ही दिवसातून किती पावले चालता? दररोज किमान ३० मिनिटे चाला, १०,००० पावले चाललात तर त्याहून चांगले. 

तुम्हाला तुमच्या झोपेचे तास माहित असले पाहिजेत. दररोज ७-८ तास झोपण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या कंबरेचा आकार किती आहे? पुरुषांची कंबर ९० सेमीपेक्षा कमी आणि महिलांची ८० सेमीपेक्षा कमी असावी.

तुमचा रक्तदाब तपासा. तुमचा रक्तदाब १२०-८० च्या दरम्यान ठेवा.

तुम्हाला तुमचे वाईट कोलेस्ट्रॉल एलडीएल पातळी माहित असले पाहिजे. तसेच एनबीएसी देखील तपासावा. 

हृदयविकाराचा झटका येणाऱ्या ५० टक्के लोकांचा एका तासाच्या आत मृत्यू होतो आणि ते रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत.

Click Here